Uncategorized
पातुडर्यातील शिक्षिकेचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अपघाती मुत्यू कवठळ भेंडवळ पेसोडा फाट्या जवळील घटना

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथील रहिवासी तथा जळगाव जा तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जि प शाळेवर कार्यरत शिक्षिकेला कवठळ भेडवळ रसत्यावर पेसोडा फाट्या जवळ अज्ञात चार चाकी वाहनाने जबर धडक दिल्याने शिक्षिकेचा घटना स्थळी मुत्यू झाल्याची घटना दि २ मार्च रोजी सकाळी अंदाजे सव्वा सात वाजता घडली सदर अपघातात दुदैवी मुत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव वृषाली प्रकाश गावंडे रा पातुर्डा अं वय ३६ वर्ष आहे
या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे पातुर्डा येथील शिक्षीका वृषाली प्रकाश गावंडे पिंपळगाव काळे जि प शाळेवर शिक्षीका म्हणुन कार्यरत होत्या स्कुटी दुचाकी क्र एम २८ ए एल ५८1५ ने नेहमी प्रमाणे पिंपळगाव काळे शाळेवर कवठळ भेंडवळ मार्गे जात असतांना सदर दुचाकीला अज्ञात पांढऱ्या चार चाकी वाहनाने जबर धडकेत सदर शिक्षिकेचा घटना स्थळीच मुत्यू झाला शिक्षिकेच्या दुचाकीला धडक देऊन वाहन चालक घटना स्थळा वरून पातुर्डा फाटा मार्गे पळाला शेता जाणाऱ्या पादचारी शेतकऱ्यानी सांगीतले सदर घटने माहिती समजताच जळगाव जा व तामगाव पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते जळगाव पोस्टे हद्दित घटना स्थळ येत असल्याने जळगाव पोलीसांनी पंचनामा केला प्रेत श्वविच्छेदन झाल्या नंतर पातुर्डा येथे स्थानिक स्मशान भुमित शिक्षिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले शिक्षिकेचा अपघाती मुत्यूमुळे पातुर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृतक शिक्षिकेच्या पश्चात पती १ मुलगा , सासु सासरे बराच आप्त परिवार आहे



