कृषी
फार्मर कप योजनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशिल रहावे तालुका कृषि अधिकारी आर एन जाधव संग्रामपूर येथे तालुका स्तरीय फार्मर कप आढावा बैठक संपन्न


संग्रामपुर [प्रतिनिधी ] फार्मर कप योजनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशिल रहावे तालुका कृषि अधिकारी आर एन जाधव असे प्रतिपादन पं स छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दि १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता फार्मर कप तालुकास्तरीय आढावा बैठक प्रसंगी केले ते पुढे म्हणाले कि फार्मर कप योजना नसुन शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीचे एक उत्पन्नाचे स्त्रोत आहे शेतकऱ्यांनी फार्मर कप योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास करावा असे आव्हान तालुका कृषि अधिकारी आर एन जाधव यांनी केले
फार्मर कप ` खरीप हंगाम सन २०२६ ते २०२७ चे शेतकरी गट बांधणी तालुका स्तरीय बैठक आयोजित करण्यात आले होते पं.दे.कृ.वि.कृषक विभाग अकोला येथे दि.१६ ते १८/ फेब्रु /२०२६ दरम्यान चे `फार्मर कप ` तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणार्थी ( निमंत्रक )तसेच गटात सहभागी होणारे सदस्य शेतकरी बंधूनी आपली फार्मर कप तालुका स्तरीय आढावा बैठकीला सहभाग नोंदवला. यावेळी तालुका कृषि विभागचे आसंबे ,पानी फाउंडेशन विभागीय समन्वयक ज्ञानेश्वर इधाते यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रवीण कंडारकर यांनी शेतकरी गट बांधणी अनुभव या विषयी शेतकरीना मार्गदर्शन केले. बल्लाडी जय किसान गटाचे निमंत्रक व सर्व सदस्य यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.संचालन कुंदेगांव राजे छत्रपती गटाचे निमंत्रक नागसेन वानखडे यांनी केले तर मान्यवरांचे व उपस्थित शेतकरी यांचे साक्षी राऊत यांनी आभार मानले आढावा बैठकीचे उत्कृष्ठ नियोजन कृषि विभागाचे गवई यांनी केले यशस्वीते साठी तालुका कृषी विभाग, पानी फाउंडेशन, उमेद अभियान, संग्रामपूर तालुका यांनी प्रयत्न केले यावेळी निमंत्रका सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते



