आंदोलनराजकीय

गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव कमी करावे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे तहसिलदारांना निवेदन

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या किंमतीत तब्ब्बल ६० रुपयांची वाढ करून नागरिकांवर आर्थिक भार टाकला आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या वाढवलेल्या किंमती तात्काळ कमी करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदारांकडे  करण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. मनमोहन सिह यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढल्या तरी त्याचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडू दिला गेला नाही त्या काळात सबसिडीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यात आला होता.यूपीए सरकारच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर सुमारे ४०० रुपयांत उपलब्ध होता. मात्र सध्याच्या काळात घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे.
याशिवाय व्यावसायिक गॅस सिलेडरच्या किमतीतही मोठी वाढ होऊन त्या सुमारे १९०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. या दरवाढीचा फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत असून हॉटेल व्यवसाहीक अडचणीत आला आहे. गॅस दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किंमतीत केलेली वाढ तात्काळ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष राजनकार. जिल्हा सरचिटणीस राजेन्द्र वानखडे , अभयसिह मारोडे ,सतीश टाकळकर. जितेंद्र वानखडे. दीपक गव्हांदे. हरिदास दामधर. अशोक भिवटे. किशोर रौंदळे. मोहन डाबरे. गणेश खिरोडकार. सोपान वेरूळकर. संजय बकाल .शंकरनाथ विश्वकर्मा याच्यासह तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!