पातुडर्यात दि.विदर्भ को आप मार्केटिंग फेडरेशन नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ प्रति क्विंटल ५३२८ रुपये भावाने हेक्टरी १५ क्विंटल घेणार

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथे सन २०२५-२६ करीता नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी चा शुभारंभ दि १५ नोव्हेंबर रोजी शेतकरी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री सह संस्थेचे संस्थापक विश्वनाथ झाडोकार यांचे हस्ते करण्यात आला सर्व प्रथम संत गजानन महाराज प्रतिमेचे व सोयाबीन कटय्याचे पुजन विश्वनाथ झाडोकार यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते करुन शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा मोजण्याला सुरुवात करण्यात आले नाफेड अंतर्गत दि.विदर्भ को आप मार्केटिंग फेडरेशन सेंटर व भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री सहकारी संस्था यांच्या संयुक्त विदमाने प्रति क्विंटल ५३२८ रुपये भावाने हेक्टरी १५ क्विंटल सोयाबीन घेतले जाणार असल्याचे शेतकरी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री सह संस्थेचे अध्यक्ष अड विरेंद्र झाडोकार यांनी उपस्थित शेतकऱ्यां सक्षम जाहिर केले यावेळी उपाध्यक्ष वासुदेवराव अढाव, संचालक संजय वाकळे, गजानन चिकटे,विष्णु झाडोकार,तसेच ग्रामसेवा सह.संस्थेचे अध्यक्ष शरद तायडे, उपाध्यक्ष प्रकाश देशमुख, संचालक लोकेश राठी, शेख सुलतान , सतिष चोपडे,गणेश खोंड,रविंद्र झाडोकार, सचिव संजय पांडे,नाफेड केद्रावरील कर्मचारी,तसेच संतोष गाडे, अविनाश दाभाडे,व सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते.




