क्राईम

खिरोड्यात अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले तहसिलदार प्रशांत पाटील यांची धडक कारवाई

 

संग्रामपूर [प्रतिनिधी ] अवैध रेती वाहतुक करणारे दोन टिप्परवर तहसिलदार प्रशांत पाटील यांनी आज दि १९नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता खिरोडा येथे धडाकेबाज कारवाई केल्याने अवैध रेती व्यवसाईकांचे धाबे दणांनले आहे महसुल पथकाने घटनास्थळी पंचनामा करुन दोन्ही वाहनांवर कारवाई करून तामगाव पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे तालुक्यातील खिरोडा पूर्णा नदी जवळ विना परवाना अवैध रेती वाहतूक करताना २ टिप्पर वाहनाची तपासणी करून चालक व वाहन मालकाजवळ विचारणा केली असता त्यांनी वाहतूक परवाना नसल्याचे सांगितले. २ ब्रास असलेले टिप्पर क्रमांक MH 28 BB 4073 गाडी मालक विवेक दाणे रा.खिरोडा व दुसरी 2 ब्रास वाहन टिप्पर क्रमांक MH 28 BB9673 वाहन मालक गौरव दाणे रा.खिरोडा याचे तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या आदेशान्वये अवैध रेतीचे वाहन जप्त करून तामगाव पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले.सदर पथकामध्ये तहसीलदार प्रशांत पाटील ,नायब तहसिलदार विकास शिंदे , मंडळ अधिकारी के एस तांबारे ,कवठळ एस एस कुसळकर, ग्राम महसूल अधिकारी के के जगताप ,ग्राम महसूल अधिकारी जाधव, ग्राम महसूल अधिकारी विनोद भिसे ,दामोदर सहभागी झाले होते अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्परवर तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या पथकाने धडक कारवाईची अवैध रेती व्यवसाईकांत दहशत निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!