पातुर्डा येथील पाचशे मीटर मुख्य रस्त्याचे काम कासव गतीने ! झालेले कांक्रीट काम दर्जाहिन ? गुणनियंत्रण विभागा कडून चौकशी गरजेची

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील जिल्हा परिषद हायस्कूल ते आठवडी बाजार या सुमारे पाचशे मीटर रस्त्याचे काम कंत्राटी कंपनीने सुरू केले आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व कासव गतीने सुरू असल्याने नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत किळकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्याने कंत्राटदार कंपनीच्या मनमानी मुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुदंड सहन करावा लागला
शासनाने खांडवी ते पंचगव्हाण दरम्यान च्या रस्ता सुधारण्याचे काम गेल्या सात वर्षांपूर्वी हाती घेतले आहे हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून यात पातुर्डा गावांतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल ते बस स्थानक आठवडी बाजार हे काम दिर्घकाळा पासून प्रलंबीत व रखडलेले आहे यापुर्वी राधाकृष्ण मंदिर समोर गट्टू बसविण्यास सुज्ञ नागरिकांनी विरोध केला होता त्यामुळे अपुर्ण अवस्थेत पडून असुन सदरचे काम थंड बसत्यात पडले होते रस्ता कामाचे काँक्रिटीकरण गेल्या महिनाभरापूर्वी सुरू झाले आहे रस्ता खोदून ठेवायचा व तो कित्येक दिवस करायचा नाही हा फंडा कंत्राटी कंपनीने यावेळी हे गिरवला आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे काम अर्धवट करून काम सोडून देण्यात आलेले आहे .यामुळे पादचारी नागरिक ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे रस्ता अर्धवट असल्याने एसटी महामंडळाच्या बसेस आठवडी बाजार बसस्थानक पर्यंत येत नाही प्रा आ केंन्द्र गावाबाहेरूनच वळवावे लागतात परिणामी गावकऱ्यांना सुमारे अर्धा किलोमीटर पायी यावे लागते प्रवाशी निवाऱ्या अभावी उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी उघड्यावर बसची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत राहावे लागते सध्या लग्न करायचे दिवस असून मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो तसेच या रस्त्याने येणारी जाणारी वाहतूक कोंडी होऊन त्रास सहन करावा लागतो. सुमारे दोन महिन्यापूर्वी कंत्राटी कंपनीने पेवर ब्लाक रस्ता गावकऱ्यांच्या विरोधामुळे कंपनीचे मनसुबे अशस्वी झाल्याने राव न करि ते गावकरी अखेर संबंधीत कंत्राटी कंपनीच्या अधिकारी नमले व काँक्रीट चा रस्ता करण्याचे काम हाती घेतले पण गेल्या महिन्याभरापासून रखडून ठेवल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या रस्त्यावर पाणी मारण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे तसेच यावर थातूरमातूर फाऱ्या टाकून त्या दिवसातून एकदा ओल्या करण्यात येतात एक ते दोन तासातच त्या फाऱ्या कोरड्या होऊन जातात योग्य प्रमाणात पाणी नसल्यामुळे हा रस्ता आताच खचण्यास सुरू झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे पाहणी करावी व कंत्राटी कंपनीला काम त्वरित करण्याबाबत सुचना द्याव्या तसेच या रस्त्याचे काम गुण नियंत्रण विभागाकडून तपासणी करावी अशी ही मागणी पातुर्डा , कोद्री , टाकळी पंच कुंदेगाव, आवार , उकळी बु परिसरातील प्रवासी व विशेष पातुर्डा ग्रामस्थां कडून जोर धरत आहे.
👉बॉक्स👈
तीन जिल्ह्यांना जोडणारा असल्यामुळे या रसत्यावर नेहमी वाहतूकीची वर्दळ असते सध्या कॉंक्रिटीकरण सुरू झाले आहे हे संथ गतीने असल्याने पादचारी व वाहतुक प्रभावीत होत आहे वाहन चालकांना कमाली त्रास सहन करावा लागत आहे रसत्याचे काम त्वरित पुर्ण करुन रहदारी योग्य रस्ता करावा कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने याकडे संबंधीत अधिकारी यांनी जातीने लक्ष द्यावे
शिवकुमार चांडक सामाजीक कार्यकर्ते पातुर्डा
👉बॉक्स👈
सध्या लग्न करायचे दिवस असून रस्ता काम प्रलंबित असल्यामुळे गावातून बस स्थानक पर्यंत बसेस येत नाही यामुळे प्राथमिक आरोग्य केंन्द्रा जवळ बसेस पकडण्यासाठी विद्यार्थी सह अबाल वृध्दांना पायपीट करित प्रवाशांना उन्हाताना ताटकळत बसावे लागते
रमण सेवक प्रतिष्ठीत नागरिक पातुर्डा
अपुर्ण कामे त्वरित पुर्ण करुन रस्ता रहदारी योग्य करा
७ वर्षा पासुन खांडवी भेडवळ ते पंचगव्हाण रसत्याचे काम सुरु असुन पातुर्डा येथील शाळा ते आठवडी बाजार मुख्य रस्ता असल्याने नेहमी वाहन पादचारी यांची वर्दळ दोन्ही बाजुने अर्धवट कामे अधुन मधुन केले जात असल्याने ट्राफीक जॉम होने नेहमीची डोके दुखीमुळे नागरिक त्रस्त आहेत अर्धवट कामे त्वरित पुर्ण करण्यात यावे संबंधीत कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्रस्त जनतेचा अंत पाहू नये
अजय राहाटे
युवा नेते भाजपा


