चार दिवसा पासुन बेपत्ता गजानन जगताप यांचा मृतदेह विहिरीत सापडला बावनबीर येथील घटना

चार दिवसा पासुन बेपत्ता गजानन जगताप यांचा मृतदेह विहिरीत सापडला बावनबीर येथील घटना
संग्रामपूर [प्रतिनिधी] तालुक्यातील बावनबीर येथील ५० वर्षीय ईसम गेल्या ४ दिवसा पासुन बेपत्ता होता याबाबत सोनाळा पोस्टेला मिसिंगची नोंद नातेवाईकां केली बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र अखेर गावालगत एका विहिरीत मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यात तरगतांना आढळला शुक्रवारी रात्री उशीरा सोनाळा पोलीसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतक गजानन पांडुरंग जगताप यांचा मृतदेह बाहेर काढले गजानन जगताप हे ९ जून रोजी सकाळी घरातून कामानिमित्त बाहेर पडले होते. दुपारी मुलीशी त्यांचा फोनवर संपर्क झाला होता. “लवकरच घरी येतो,” असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद येत होता नातेवाईकांनी युध्दस्तरावर शोध घेतला अखेर गावा लगत विहिरीत मृतदेह आढळला
सोनाळा पोलीसांनी घटना स्थळी पंचनामा केला शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर घटनेचा पुढील तपास बीट जमादार पवार करित आहेत



